Tech Tips : भारतात इयरफोन, हेडफोन आणि इयरबड्सची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. बाजारात विविध प्रकारचे विविध कंपन्यांचे इयरफोन, हेडफोन आणि इयरबड्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, लोकांना सर्वोत्तम पर्याय निवडणे कठीण झाले आहे. बऱ्याचदा लोक हे ठरवू शकत नाहीत की इयरफोन त्यांच्यासाठी योग्य असतील की इयरबड्स. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी लक्षात सांगणार आहोत ज्या लक्षात घेऊन तुम्ही इयरफोन, हेडफोन किंवा इयरबड खरेदी करण्याचा विचार करू शकता.


इयरफोन आणि हेडफोन


भारतीय मार्केटमध्ये दोन प्रकारचे इयरफोन किंवा हेडफोन उपलब्ध आहेत. यामध्ये वायर्ड आणि ब्लूटूथ असे दोन प्रकार आहेत. ब्लूटूथ हेडफोन किंवा इयरफोन चार्ज करणे आवश्यक आहे. ते थोडे जड असतात कारण त्यांच्याच्या इनबिल्ट बॅटरी असते. जर तुम्हाला दररोज अनेक तास हेडफोन वापरावे लागत असतील तर तुम्ही वायर्ड हेडफोन खरेदी करता. कारण चार्जिंग इयरफोन किंवा इयरबड्स घेतले तर ते काही वेळेनंतर पुन्हा चार्ज करावे लागतील. मात्र वापर कमी असल्यास चार्जिंग इयरफोन आणि इयरबड्स उत्तम पर्याय आहे. 


ओव्हर इयर हेडफोन


ओव्हर इयर हेडफोन संपूर्ण कान कव्हर करतात. ते आकाराने मोठे आहेत, ज्यामुळे त्यांच्यामध्ये मोठे ड्रायव्हर्स सहजपणे सेड केले जाऊ शकतात. ज्यामुळे त्यांचा आवाज उत्तम दर्जाचा आणि बासही चांगले मिळतात. हेडफोन कानावर लावल्यानंतर आजूबाजूचा बाहेरचा आवाज खूप कमी येतो. कारण ते तुमचे संपूर्ण कान झाकतात. ओव्हर इयर हेडफोनमुळे कानांवरही दबाव येतो.


इअरबड्स


इअरबड हे हेडफोनचे छोटं रूप आहे. यात इयरफोन आणि हेडफोन दोन्हीचा फील येतो. इयरफोनच्या तुलनेत इअरबड्स थोडे महाग आहेत.


जॅक प्रकार


बहुतेक हेडफोन्स आणि इयरफोनमध्ये 3.5mm जॅक दिले जातात. काही हेडफोन यूएसबी टाइप-सी कनेक्टिव्हिटीसह येतात. यूएसबी-टाइप-सी असलेले हेडफोन चार्ज करताना वापरले जाऊ शकत नाहीत. कारण चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटीसाठी एकच पोर्ट उपलब्ध आहे. वेगवेगळ्या चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटीसह हेडफोन घेणे हा एक चांगला पर्याय आहे.


इतर बातम्या