नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे पेन पाहिले असतील. मात्र कॅनडामध्ये कुणालाही विश्वास बसणार नाही, असा पेन अस्तित्वात आणण्यात आलाय. या पेनने चक्क मोबाईल चार्ज करता येणार आहे.


चार्जराईट असं या पेनचं नाव असून 1900 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. हे पेन चार्जरचं 5 तासांचं बॅटरी बॅकअप आहे. या अनोख्या चार्जरमध्ये 16 GB मेमरी कार्ड आहे. तर पेनच्या साहाय्याने मोबाईल स्क्रिनही साफ करता येईल.



कॅनडासह इतर देशात या पेन चार्जरची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेन चार्जरचा वापर मोबईल व्यतिरिक्त लॅपटॉपसाठीही केला जाऊ शकतो. या पेनवर एक कॅमेरा देण्यात आला असून त्याद्वारे फोटो आणि व्हिडिओही काढता येतात.