मुंबई: विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखून टीम इंडियाची निम्मी मोहीम फत्ते केली होती. मग रोहित शर्माच्या नाबाद शतकानं भारताचा विजय आणखी सोपा केला.

रोहितनं शिखर धवनच्या साथीनं 87 धावांची दमदार सलामी दिली. मग त्यानं आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वीरेंद्र सेहवागचं ट्विट

या विजयानंतर टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्याच स्टाईलमध्ये हटके ट्विट केलं.

सेहवागने आपल्या ट्विटमधून पाकिस्तानवर निशाणा साधला.

सेहवाग म्हणतो, "नातवांनी, चांगला प्रयत्न केला. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न चांगला होता. घरातलीच गोष्ट आहे. फादर्स डेला मुलासोबत फायनल मॅच आहे. हा विनोद आहे, सिरियस होऊ नका.

https://twitter.com/virendersehwag/status/875385485140426752

इंग्लंडला हरवून पाकिस्तान फायनलमध्ये

यापूर्वी पाकिस्तानने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे येत्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना रंगणार आहे. 

दहा वर्षांनी दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान हे संघ जवळपास 10 वर्षांनी आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरोधात फायनलमध्ये पोहोचले आहेत.

यापूर्वी 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल रंगली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

संबंधित बातम्या

रविवारी ड्रीम फायनल, बांगलादेशला धूळ चारत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक!

पाकिस्तानविरुद्धचा सामना इतर सामन्यांप्रमाणेच : विराट कोहली

8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली सर्वात वेगवान फलंदाज

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा