मुंबई: सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी माध्यमं म्हणजे अॅप आणि या अॅपचा मराठी इंडस्ट्रीतही आता स्मार्टपणे वापर होऊ लागला आहे. ग्लोबल एंटरटेन्मेंटमध्ये आता मराठी एंटरटन्मेंटही हायटेक होऊ लागलं आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे कॅफे मराठी हे मोबाईल अॅप.

 

 

सिने न्यूज, रिव्ह्यू, गॉसिप्स, सेलिब्रिटी स्टाईल यांसोबतच फिल्म फेस्टिव्हल, फिल्म अॅवॉर्ड आणि शो टाईम अशा मराठी मनोरंजन विश्वातल्या प्रत्येक बातम्या देणारं हे प्रादेशिक मनोरंजन विश्वातलं पहिलंच अॅप आहे. नुकतंच या अॅप लॉन्च करण्यात आलं

 

 

तुमच्या गूगल प्ले स्टोअरमध्ये हे अॅप अगदी मोफत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यामध्ये केवळ मल्टिप्लेक्सचेच नाही, तर सिंगल स्क्रिन थिएटरमधले मराठी सिनेमांचे शो टाईमही तुम्हाला पाहायला मिळतील.

 

 

या अॅपद्वारे तुम्हाला सगळ्या फिल्म फेस्टिव्हलची माहिती आणि मराठीत होणारे एकूण फिल्म अॅवॉर्ड आणि मराठी चित्रपट संघटनांनांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामुळे मराठी प्रेक्षकाला मनोरंजनाचा हा आनंद आता केवळ एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे.