नवी दिल्ली: ह्युडईची प्रीमियम हॅचबॅक आय 20 ने विक्रीचा नवा विक्रम रचला आहे. लाँचिंगपासून या कारची तब्बल 10 लाख ग्राहकांनी याची खरेदी केली आहे. या आकड्यांमध्ये 2008 मध्ये लाँच झालेली, आय-20. एलीट आय-20 आणि आय-20 एक्विट आदी मॉडेलचा समावेश आहे.
भारतात ह्युडईची एलीट आय 20 ही कार सर्वात लोकप्रिय ठरली आहे. 2015 सालातील 'कार ऑफ द इअर' हा पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले आहे. या कारला स्टाईलिश लूकसोबतच अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत.
ह्युडईच्या या लहान कारचे सर्वत्रच कौतुक झाले आहे. पण आकड्यांचा विचार केल्यास, या कारची विदेशापेक्षा भारतात जास्त विक्री झाली आहे. कारची बिल्ड क्वॉलिटी, नवे तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन, चांगला परफॉर्मन्स आणि अन्य फिचर्समुळे या कारला 'व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट' असे संबोधले जात आहे. बाजारातील बदलत्या ट्रेंडनुसार या कारमध्ये फिचरचा समावेश करून अपडेट करण्यात आल्याचा कंपनीने दावा केला आहे.
ह्युडईने 2014 सालातील आय 20ला नुकतेच अपडेट करण्यात आले आहे. या कारची किंमत 5.6 लाखपासून सुरु होते. याचाच अर्थ ही कार मारूती, सुझुकी बलेनो, फोक्सवॅगन पोलो आणि फोर्ड फिगोप्रमाणेच ही कार अधुनिक आहे.