Twitter Blue Checkmark: इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबक्रिप्शनचा पर्याय देण्यात येणार आहे.  ब्लू टिकसाठी प्रतिमहिना 8 डॉलर म्हणजेच 661 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या असणारी ब्लू टिक सिस्टिम दर्जाहीन असल्याचं इलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय. त्यामुळे ब्लू टिक असणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


इलॉन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर वापरकर्त्यांसाठीही बरेच काही बदलू शकते, असे संकेत मागच्या काही दिवसांत वेळोवेळी त्यांनी ट्वीट करून दिले होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 






प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार ब्लू टिकच्या किंमती कमी जास्त असतील, असे ट्वीट इलॉन मस्क यांनी केलेय. मस्क यांनी ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी काही खास सुविधा मिळणार असल्याचेही सांगितलं आहे. यामध्ये रिप्लाय, मेन्शन आणि सर्चमध्ये प्राथमिकता मिळेल, जे तुम्हाला स्कॅम आणि स्पॅमपासून दूर ठेवेल. अधिक लांबीचा व्हिडीओ आणि ऑडिओ अपलोड करण्याची सुविधा मिळेल. तसेच अर्ध्याहून अधिक कमी जाहिराती येतील, असे सांगितलं. 



ट्विटर बायो मध्ये "चीफ ट्वीट" असा उल्लेख!


टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात 44 अब्ज देऊन ट्विटर अधिग्रहण करार केला आणि मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा ताबा घेतला. मस्क या आठवड्याच्या सुरुवातीला एक सिंक घेऊन ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले. Entering Twitter HQ – let that sink in! हे वाक्य लिहित त्यांनी हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विटरमधील अधिकाऱ्यांशी कॉफी पीत गप्पा मारतानाचा फोटो शेअर केला. त्याच दिवशी त्याणी त्यांचे ट्विटर बायो मध्ये "चीफ ट्विट" असा उल्लेख करत स्वतःचे ट्विटर update केले.


NFT च काय होणार ?


Twitter ने नॉन-फंजिबल टोकन (NFT) ट्वीट टाइल्स लॉन्च केले आहे. विकसकांच्या म्हणण्यानुसार निर्माते आणि ग्राहक थेट ट्विटरद्वारे एनएफटी खरेदी, विक्री आणि देवाणघेवाण करू शकतील, ज्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.  जानेवारी महिन्यामध्ये मस्कने NFT वर टीका केली की, "हे त्रासदायक आहे" अशा आशयाचं ट्वीट इलॉन मस्कने केलं होतं.