Elon Musk The owner of Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क ट्विटर मायक्रोब्लॉगिंग साइटचे प्रमुख बनले आहेत. मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर वापरकर्त्यांसाठीही बरेच काही बदलू शकते, असे संकेत मागच्या काही दिवसांत वेळोवेळी त्यांनी ट्वीट करून दिले आहेत. कंपनीत मोठे बदल पाहायला मिळतील, असं बोललं जात आहे.
ट्विटर बायो मध्ये "चीफ ट्वीट" असा उल्लेख!
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात 44 अब्ज देऊन ट्विटर अधिग्रहण करार केला आणि मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा ताबा घेतला. मस्क या आठवड्याच्या सुरुवातीला एक सिंक घेऊन ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले. Entering Twitter HQ – let that sink in! हे वाक्य लिहित त्यांनी हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विटरमधील अधिकाऱ्यांशी कॉफी पीत गप्पा मारतानाचा फोटो शेअर केला. त्याच दिवशी त्याणी त्यांचे ट्विटर बायो मध्ये "चीफ ट्विट" असा उल्लेख करत स्वतःचे ट्विटर update केले.
कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल, हे वृत्त चुकीचे
अधिग्रहणानंतर मस्कने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे यांना गुरुवारी काढून टाकले होते. याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरपूर्वी ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते, अशा बातम्या समोर येत होत्या. एका व्यक्तीने ट्विटरवर इलॉन मस्क यांना कर्मचारी कपातीबद्दल प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना, हे वृत्त चुकीचे असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.
इलॉन मस्क हे सध्या कंपनीचे एकमेव संचालक!
इलॉन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पद स्वीकारल्यानंतर काही तासातच ट्विटरचे जुने संपूर्ण कंपानीचे बोर्ड काढून टाकले आहे आणि आता इलॉन मस्क हे सध्या कंपनीचे एकमेव संचालक आहेत, असे कंपनीने सोमवारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे कळवलं आहे. मस्क यांनी नंतर ट्विटरवर सांगितले की, हा नवीन कंपनीचा बोर्ड सेटअप "तात्पुरता" आहे, परंतु आता कंपनीच्या नवीन बोर्डात कोण असेल यासंदर्भातले कोणतेही तपशील देण्यात आलेले नाही.
ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागणार का?
ट्विटरचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पाऊल उचलले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचा थेट फटका वापरकर्त्याला (युजर्स) बसणार आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर वापरकर्त्याला युजर्सचं खातं व्हेरिफाइड करण्यासाठी आणि ब्लू टिक देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच, त्यांचं अकाउंट व्हेरिफाईड करण्यासाठी 4.99 डॉलर्स म्हणजेच, सुमारे 415 रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ट्विटरने याला अद्याप कुठलाही दुजोरा दिलेला नाही.
NFT च काय होणार ?
Twitter ने नॉन-फंजिबल टोकन (NFT) ट्वीट टाइल्स लॉन्च केले आहे. विकसकांच्या म्हणण्यानुसार निर्माते आणि ग्राहक थेट ट्विटरद्वारे एनएफटी खरेदी, विक्री आणि देवाणघेवाण करू शकतील, ज्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. जानेवारी महिन्यामध्ये मस्कने NFT वर टीका केली की, "हे त्रासदायक आहे" अशा आशयाचं ट्वीट इलॉन मस्कने केलं होतं.