मुंबई: टेलिकॉम जगतातील तगड्या स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी कंपनी बीएसएनएलने दमदार पाऊल टाकलं आहे. बीएसएनएलने तीन नव्या ऑफर आणल्या आहेत. 'दिल खोल के बोल', 'नहले पर दहला' आणि 'ट्रिपल एस' असे हे प्लॅन आहेत.  इतकंच नाही तर बीएसएनएलने सध्या सुरु असलेल्या 399 च्या प्लॅनमध्येही बदल केला आहे. बीएसएनएलच्या ट्रिपल एस प्लॅनमधील एक महत्त्वाचा 333 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 3GB 3G डेटा मिळणार आहे. याची वैधता तब्बल 90 दिवस म्हणजेच तीन महिने आहे.  'ट्रिपल एस' ऑफर 333 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 3GB 3G डेटा. अनलिमिटेड कॉलिंग फ्री. वैधता 90 दिवस. याचाच अर्थ 333 रुपयांत तुम्हाला एकूण 270 GB 3G डेटा मिळेल. 'दिल खोल के बोल' ऑफर 349 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 2GB 3G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग फ्री. वैधता 28 दिवस नहले पर दहलाऑफर 395 रुपयांच्या रिचार्जवर दररोज  2GB 3G डेटा. तसंच होम नेटवर्कमध्ये कॉलिंगसाठी 3 हजार मिनिटे फ्री. तर अन्य नेटवर्कवर 1800 मिनिटे फ्री असतील. हा पॅक 70 दिवसांसाठी वैध असेल.
प्लॅन फायदे वैधता
Rs. 333 दररोज 3GB 3G डेटा 90 दिवस
Rs. 349 दररोज 2GB 3G डेटा, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग (होम सर्कल) 28
Rs. 395 दररोज 2GB 3G डेटा, बीएसएनएल नेटवर्कवर 3000 मिनिटं आणि इतर नेटवर्कवर 1800 मिनिटं फ्री 71 दिवस