मुंबई: स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी लवकरच आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनचं नाव DTEK 60 असं असू शकतं. ब्लॅकबेरीनं मागील महिन्यात DTEK 50 हा अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच केला आहे.


ब्लॅकबेरीच्या या स्मार्टफोनच्या फीचरबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. तसंच याची स्क्रिन साइज 5.5 इंच असेल. तसंच यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4जीबी रॅम असणार आहे. तसंच या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा कॅमेरा. यात 21 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

या स्मार्टफोनबाबत अशीही माहिती समोर आली आहे की, DTEK 50 प्रमाणे या नव्या स्मार्टफोनला फिजिकल बोर्ड नसेल.

मागील वर्षी कंपनीनं आपला पहिला अँड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन प्रिव्ह लाँच केला होता. त्यावेळी ग्राहकांनी देखील या स्मार्टफोनला पसंती दिली होती.