मुंबई: तुम्ही हॉलिवूडचा ट्रान्सफॉर्मर्स हा सिनेमा पाहिला आहे का? या सिनेमांच्या आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या 4 भागांमध्ये आलीशान कारने आपली रुपे विविधप्रकारे बदलाताना दाखवण्यात आले होतं.


मायकल बे यांच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 4 सिनेमाच्या मालिकेतील पहिल्या सिनेमाने या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. तसेच चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटावर टीका करुनही 2014मध्ये प्रदर्शित या चित्रपटाने कमाईचा उच्चांक गाठला. आता 2017मध्ये याचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.

तेव्हा अशाप्रकारचे सिनेमे पाहिल्यानंतर हे फक्त सिनेमातच होऊ शकते, वास्तवात असं काहीही होऊ शकत नाही, असं अनेकांचं ठाम मत असतं. मात्र तुर्कस्थानमधील इंजिनिअर्सच्या 16 जणांच्या टीमने हा प्रकार वास्तवात उतरवला आहे. या टीमने जी कार बनवली आहे, त्याचे 1 मिनीटात रोबोमध्ये रुपांतरी होते. विशेष म्हणजे, हा रोबो तुमच्या प्रश्नांना उत्तरंही देतो.

या कारचं नाव Letrons असं असून, रिमोटच्या आधारे या कारचे रोबोमध्ये रुपांतर होतं. कंपनीने यासंबंधी माहिती देताना, ही मायकल बे यांच्या सिनेमाप्रमाणे युद्धासाठी याची निर्मिती केलेली नसल्याचं मिश्किलपणं सांगितलं.

दरम्यान ही कार रहदारीच्या ठिकाणी चालवणे शक्य नाही. तसेच याचे रोबोमध्ये रुपांतर केल्यानंतर ही चालू शकत नाही, असेही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

व्हिडिओ पाहा