मुंबई : ब्लॅकबेरी मार्केटमध्ये कमबॅकसाठी तयार असून, अपार मेहनतीनंतर एका नवा अँड्रॉईड स्मार्टफोन घेऊन येत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, जगातील सर्वात सुरक्षित असा ब्लॅकबेरीचा आगामी स्मार्टफोन असणार आहे. यूझर्सची बिझनेस संबंधित आणि खासगी माहिती इनक्रिप्ट असणार आहे. बॅकअप वाईप आणि रिस्टोअरसाठी एक मालवेअर प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.


 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेन यांनी सांगितले की, "DTEK50 स्मार्टफोन ब्लॅकबेरीचा पहिला अंड्रॉईड स्मार्टफोन असलेल्या प्रिव्हहून अधिक यशस्वी होईल. प्रिव्हला किंमतीमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली नव्हती."

 

ब्लॅकबेरी DTEK50 स्मार्टफोनचे फीचर्स-

 

  • 2 इंचाचा एचडी डिस्प्ले (1080x1920 पिक्सेल रिझॉल्युशन)

  • ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 सीपीयू

  • 2 जीबी / 3 जीबी रॅम

  • अॅड्रेना 405 जीपीयू

  • 16 जीबी इंटरनल स्टोरेज

  • मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 512 जीबीपर्यंत एक्स्पांडेबल

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • पॉवर बॅकसाठी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी

  • 2610 एमएएच क्षमतेची बॅटरी


 

ब्लॅकबेरी DTEK50 स्मार्टफोन ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतातील या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत असेल, अशी माहिती मिळते आहे.