Bill Gates : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे मालक बिल गेट्स (Bill Gates) हे नेहमी चर्चेत असतात. अनेकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांनी माहिती दिली होती की, ते सॅमसंग गॅलेक्सी जेड फोल्ड 3 या स्मार्टफोनचा वापर करतात. या आठवड्याच्या रेडिट एएमए दरम्यान  बिल गेट्स यांनी त्यांच्या स्मार्टफोनबाबत माहिती दिली. बिल गेट्स यांनी अनेकदा ही माहिती दिली होती की, ते अँड्रॉइड डिव्हाइसचा वापर करतात. बिल गेट्स यांनी माहिती दिली की, फोल्डच्या डिस्प्लेच्या आकाराचा स्मार्टफोन ते "पोर्टेबल पीसी" म्हणून वापरू शकतात. 

Continues below advertisement


रिपोर्टनुसार, बिल गेट्स हे सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य देतात, कारण सॅमसंगची मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी आहे. त्यांची विविध उपकरणे ही Windows सह एकत्रित चांगल्या प्रकारे वापरली जातात. 2021 मध्ये, क्लबहाऊसवरील मुलाखतीदरम्यान, बिल गेट्स यांनी नमूद केले की काही Android निर्माते मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर प्री-इन्स्टॉल करतात. तसेच, Android हे iOS पेक्षा अधिक लवचिक आहे आणि "सर्वकाही ट्रॅक" करू शकते.


Galaxy Z Fold3 5G स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत


Galaxy Z Fold3 5G चे दोन प्रकार भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनच्या एका प्रकारामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. ज्याची किंमत 1,49,999 रुपये आहे. तर दुसऱ्या प्रकारामध्ये 12 जीबी रॅम आणि  512 जीबी की इंटर्नल मेमरी देण्यात आली. या प्रकाराची किंमत 1,57,999 रुपये आहे. सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनला अनेक ग्राहकांची पसंती मिळते.  


महत्वाच्या बातम्या :