आयफोन 7 प्लस : या फोनचं 32GB व्हेरिएंट (गोल्ड मॉडल), ज्याची किंमत 72 हजार रुपये होती. हा फोन आता डिस्काऊंटनंतर 51 हजार 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 प्लसचं 128GB व्हर्जन डिस्काऊंटनंतर 57 हजार 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 82 हजार रुपये होती. त्यामुळे आयफोन 7 प्लस 32GB व्हेरिएंटवर जवळपास 20 हजार रुपये आणि 128GB व्हेरिएंटवर 24 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
आयफोन 7 : 65 हजार 200 रुपये किंमत असलेला आयफोन 7 आता 47 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर आयफोन 7 चं 32GB व्हेरिएंट, ज्याची किंमत 56 हजार 200 रुपये होती, तो फोन आता 39 हजार 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 256GB स्टोरेज व्हेरिएंट डिस्काऊंटनंतर 62 हजार 99 रुपयात मिळत आहे. आयफोन 7 32GB व्हेरिएंट (सिल्व्हर मॉडल) डिस्काऊंटनंतर 40 हजार 799 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
आयफोन 6S : 62 हजार रुपये किंमतीचा हा फोन डिस्काऊंटनंतर 55 हजार 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय फोन मानला जातो.
आयफोन SE : या फोनवर जवळपास 50 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. 39 हजार रुपये किंमताचा हा फोन 20 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.