या फोनची पहिली विक्री 10 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. मात्र 10 जुलै रोजी केवळ अमेझॉन प्राईम मेंबर्ससाठीच ही विक्री असेल. तर औपचारिकरित्या 13 जुलैपासून भारतात या फोनची विक्री सुरु होईल.
ऑनर 8 प्रोवर व्होडाफोन 45 जीबी डेटा देणार आहे. तर कंपनीकडूनही प्रत्येक महिन्याला 5 GB अतिरिक्त डेटा दिला जाईल.
ऑनर 8 प्रोचे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
- 5.7 इंच आकाराची स्क्रीन
- किरिन 960 प्रोसेसर
- 6GB रॅम
- 128 GB इंटर्नल स्टोरेज
- 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4000mAh क्षमतेची बॅटरी