मुंबई: जपानची कंपनी सोनी मोबाइलने आपल्या इवेंटर मीटिंगमध्ये भारतीय यूजर्सना नाराज केले आहे. कंपनीने चीन, भारत आणि अमेरिका या तीन देशात अपेक्षेपेक्षा खुपच कमी परफॉमन्स दिला आहे. या तिन्ही देशांमधील सोनीच्या स्मार्टफोनची विक्री केवळ 0.3 टक्केच झाली आहे. कंपनी आता या देशांमध्ये आपल्या प्रोडक्टसंदर्भात डिफोक्सची योजना तयार करत आहे.
कंपनीच्यावतीने इनवेंटर मीटवेळी एक डेटा प्रेझेंटेशन देण्यात आले. यात कंपनी आता अशा क्षेत्रांकडे आपले लक्ष वळवणार असल्याचे सांगण्यात आले. ज्यात CAGR (अॅन्यूअल ग्रोथ रेट) चांगला मिळेल. त्यामुळे कंपनी भारतातील लक्ष कमी करण्याची क्षमता आहे.
सौजन्य- ndtv.com
कंपनी आपले उत्पन्न वाढीसाठी लॅटिन अमेरिका आणि अशियाइ बाजाराकडे लक्ष केंद्रित करणार आहे.
गेल्या काही वर्षांत सोनीला भारतीय बाजारपेठेकडून निराशा मिळाली आहे. त्यामुळेच कंपनीनेने भारतीय बाजारपेठेत आतापर्यंत कोणताही सर्वसामान्य रेंजमधील किंवा हार्ड-एंड स्मार्टफोन लाँच केला नाही.