मेलबर्न: फेसबुक, गुगल आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यादरम्यान सुरु असलेल्या वादामध्ये आता फेसबुकने माघार घेतली आहे. सोशल मीडियाने पैसे न देता बातम्या शेअर करु नयेत अशा प्रकारचा कायदा ऑस्ट्रेलियाने पारित केला आहे. त्यामुळे आता गुगल वा फेसबुकला त्यांच्या पेजवर बातम्या शेअर करता येणार नाहीत.


गुगल वा फेसबुकला त्यांच्या पेजवर बातम्या शेअर करताना आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तशा प्रकारचा नवीन कायदा ऑस्ट्रेलियात करण्यात आला आहे. गेले काही दिवस ऑस्ट्रेलियन सरकार आणि फेसबुकमध्ये या गोष्टीवरुन तणाव निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या धोरणाला फेसबुकने आक्षेप घेतला होता.


नव्या मीडीया लॉ विरोधात ही बंदी घातली जात असल्याचे फेसबुकने म्हटलं होतं. त्याचा फटका अनेक वृत्तसंकेत स्थळांना बसला होता. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असलेल्यांना फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातमी वाचता येत नव्हत्या. हवामान किंवा इतर सेवांशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी ट्विटरचा आणि विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं.


Facebook : ऑस्ट्रेलियात फेसबुकने बातम्या पाहण्यास, शेअर करण्यास घातली बंदी


आता नवा कायदा पारित झाल्यानंतर फेसबुकने काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. फेसबुक, गुगल आणि इतर सोशल मीडियातून बातम्या शेअर केल्या जातात. त्या बातम्या शेअर करताना फेसबुक वा इतर सोशल मीडियाना कोणतेही शुल्क लागत नाही. त्याविरोधात आता ऑस्ट्रेलिया सरकारने नवा कायदा पारित केला आहे. आता या कायद्यानुसार सर्व सोशल मीडियांना आपल्या पेजवरुन बातम्या शेअर करण्यासाठी शुल्क द्यावं लागेल.


ऑस्ट्रेलियाच्या या धोरणाची चर्चा आता जगभर सुरु झाली असून अनेक देशात अशा प्रकारचा कायदा करावा अशी मागणी केली जात आहे. भारतातही या कायद्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालीय. भारत सरकार आणि फेसबुक, ट्विटर वाद काही दिवसांपासून सुरु आहे. भारत सरकारने शेतकरी आंदोलनाशी संबंधित काही पेजेस आणि खाती बंद करावी असा आदेश फेसबुक आणि ट्विटरला सांगितलं होतं.


फेसबुककडून म्यानमार लष्कराचे मुख्य पेज डिलीट, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी कारवाई