अनेक दिग्गज कंपन्या सोशल मीडियावर कल्पकता लढवून जाहिराती करतात. लक्झरी कार तयार करणाऱ्या BMW USA कंपनीने ट्विटर अकाऊण्टवरुन आपल्या M4 गाडीची जाहिरात केली. मरिना ब्ल्यू रंगातील या आलिशान कारच्या मागे स्पार्क उडताना दिसत आहेत. (ट्वीटमधील फोटो पाहा)
बीएमडब्ल्यूच्या कारमागून उडणाऱ्या स्पार्क्समधून ऑडी कंपनीचा लोगो (चार रिंग्स) तयार झाला आहे. हीच संधी साधत ऑडीने बीएमडब्ल्यू यूएसएचा ट्वीट कोट केला. 'जेव्हा तुम्ही हे पाहता' असं कॅप्शन ऑडीने या ट्वीटला दिलं आहे.
ऑडीने आव्हान दिल्यावर बीएमडब्ल्यू तरी कशी मागे राहील. 'आपण सामान्यपणे हे तिथेच पाहतो. रिअर व्ह्यू मिररमध्ये' असं सणसणीत उत्तर ऑडीने बीएमडब्ल्यूला दिलं.
We see it, where we usually do... in the rear view mirror.
स्पर्धेत आम्ही तुम्हाला मागे पाहतो, असंच एकप्रकारे बीएमडब्ल्यूला सुचवायचं होतं. त्यामुळे ऑडीचं बोलती बंद झाली असली तरी ट्विटराईट्सना चर्चेला कारण मिळालं.