मुंबई : भारतीय स्मार्टफोन मार्केट लीडर शाओमीने पोको F1 हा फोन भारतात लाँच केला आहे. सब ब्रँड पोकोचा हा पहिलाच फोन आहे. या फोनमध्ये क्वालकॉम फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आलं आहे, ज्यामुळे जास्त वापरामुळे फोन गरम झाल्यास आपोआप कूलिंग होईल.


या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे इंफ्रारेड फेस अनलॉक फीचर. हे फीचर आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेलं नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही अंधारात असो, किंवा उजेडात, चेहऱ्याच्या मदतीने फोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती?

पोको F1 तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा पहिला सेल 29 ऑगस्टला फ्लिपकार्ट आणि https://www.mi.com/in या वेबसाईटवर होईल.



6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या या व्हेरिएंटची किंमत 20 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28 हजार 999 रुपये आहे.

लाँचिंग ऑफर्स

पोको F1 ने आर्म्ड एडिशनही लाँच केली आहे आणि याची किंमत 29 हजार 999 रुपये आहे. फोनच्या विक्रीसाठी कंपनीने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. पहिल्या सेलमध्ये एचडीएफसी कार्डने फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सूट मिळेल. पहिल्या सेलमध्ये रिलायन्स जिओ यूजर्सना आठ हजार रुपये कॅशबॅक आणि सहा टेरा बाईटपर्यंत हायस्पीड डेटा मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये पॉलीकार्बोनेट यूनीबॉडी डिझाईन देण्यात आली आहे, दी 6.18 इंच आकाराची स्क्रीन FHD+ 2340 x 1080 पिक्सेल्स रिझोल्युशनसोबत असेल.



फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी 12 मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स 365 आणि पाच मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तर कॅमेराच्या खालीच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.

पोको F1 मध्ये 4000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचं इंटर्नल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 256 जीबीपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि रेड या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.