मुंबई : तैवानची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी असूसनं आपला नवा 4G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. असूस झेनफोन GO 4.5 LTE हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये इतकी असेल.
हा स्मार्टफोन 27 जानेवारीपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. असूसनं 6,999 रुपये इतक्या कमी किमतीत दमदार फिचर्स दिले आहेत.
असूस झेनफोन GO 4.5 LTE चे फिचर्स
ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड मार्शमेलो 6.0
रॅम : 1 जीबी
प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 क्वॉड कोअर प्रोसेसर
डिस्प्ले : 4.5 इंच स्क्रिन 854x480 रिझॉल्यूशन
मेमरी : 8 जीबी
कॅमेरा : 8 मेगापिक्सेल रिअर आणि 2 मेगापिक्सेल फ्रंट