नवी दिल्ली : रिलायन्स जिओची वेलकम ऑफर संपली असून आता नव्या वर्षात हॅप्पी न्यू ईयर ऑफर सुरु झाली आहे. मात्र या ऑफरमध्ये युझर्सना अनलिमिटेड डेटा वापरता येत नसून 1 GB प्रतिदिन एवढी मर्यादा ठेवण्यात आली आहे. 1 GB संपल्यानंतर 128Kbps या स्पीडने डेटा वापरता येतो.

युझर्सना प्रतिदिन 1 GB एवढा डेटा पुरेसा नसेल, तर जिओचा बुस्टर पॅक खरेदी करुन 1 GB लिमिटनंतरही हायस्पीड डेटा वापरता येईल. 1 GB डेटासाठी 50 रुपयांचा तर, 6 GB डेटासाठी 301 रुपयांचा बूस्टर पॅक उपलब्ध आहे.

बूस्टर पॅक कसा मिळवाल?

  • My Jio अॅप डाऊनलोड करावं

  • अॅपमध्ये लॉग इन करावं. पहिल्यांदाच अॅप वापरत असाल तर युझरनेम रजिस्टर करावं लागेल. युझरनेम म्हणून जिओचा नंबर देऊन लॉग इन केल्यानंतर My Jio पर्याय निवडावा.

  • Usage या पर्यायावर जाऊन तुम्हाला हवा तो डेटा पॅक निवडावा.

  • त्यानंतर येणाऱ्या रिचार्ज पर्यायावर क्लिक करुन बूस्टर पॅक हा पर्याय निवडावा.

  • रिचार्जसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा जिओ मनीद्वारे पेमेंट करता येईल.


 

जिओचे डेटा प्लॅन्स

  • 19 रुपयांमध्ये एक दिवसासाठी डेटा (अॅपमध्ये किती डेटा मिळेल, याचा उल्लेख नाही)

  • 50 रुपयांमध्ये 1 GB 4 G डेटा

  • 99 रुपयात 10 GB 4 G डेटा, रात्री अनलिमिटेड

  • 1499 रुपयात 20 GB 4 G डेटा, रात्री अनलिमिटेड

  • 2499 रुपयात 35 GB 4 G डेटा, रात्री अनलिमिटेड