Asus ROG Phone 6 : Asus कंपनी त्यांचे नवे धमाकेदार गेमिंग स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. Asus ROG Phone 6 आणि Asus ROG Phone 6 Pro हे दोन गेमिंग फोन आज (5 जुलै) लाँच होणार आहेत. या फोनच्या लाँचिंगसाठी ग्रँड इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. Asusचे हे दोन्ही फोन तायवानमधील तायपई येथील कंपनीच्या मुख्यालयात लाँच होणार आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता हा लाँचिंग सोहळा पार पडणार आहे.


या धमाकेदार गेमिंग फोनचा हा लाँचिंग सोहळा सगळ्या टेक्नोलॉजी चाहत्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. ‘Asus India’ या युट्युब चॅनेलवरून हा सोहळा पाहता येणार आहे. तायवानसोबतच न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता आणि बर्लिनमध्ये दुपारी 2 वाजता हे फोन लाँच केले जातील. Asus ROGचे हे दोन्ही फोन भारतात व्हर्चुअल सोहळ्याद्वारेच लाँच केले जातील. याची माहिती Asus Indiaच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.


पाहा पोस्ट:



काय असतील ‘या’ फोनची खास वैशिष्ट्य?


स्मार्टफोन्स म्हटले की, त्याच्यात आता कोणती नवी टेक्नोलॉजी आणि फीचर असणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या असतात. अशातच Asus त्याचे दोन नवे आणि पॉवरफुल गेमिंग फोन लाँच करणार असल्याने, यात आता आणखी नवे फीचर्स काय असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र, हा फोन लाँच होण्यापूर्वीच त्याच्यात काय काय नवे फीचर्स असून शकतात, याच्या चर्चा सुरु आल्या होत्या. ROG Phone 6 आणि ROG Phone 6 Pro या दोन्ही फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoCs सिस्टम असेल, असे म्हटले जात आहे. तसेच या फोनमध्ये FHD+ रिजोल्यूशन आणि 165Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंच OLED डिस्प्ले आणि 1TB स्टोरेजसह तब्बल 18GB RAM असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, 64 MP सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.


Asus कंपनीकडून अद्याप यातील एकही फीचरबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, याव नव्या फोनमध्ये अनेक लेटेस्ट अपडेट असतील, तसेच हा जगातील पहिला IPX4 गेमिंग फोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आता या फोनमध्ये नेमके कोणते फीचर्स असणार याचा खुलासा अखेर आज होणार आहे.


येथे पाहू शकाल लाँचिंग सोहळा!



महत्वाच्या बातम्या :