नवी दिल्ली :  स्मार्टफोनच्या बाजारात रोज नवनवीन व्हेरीयंटचे फोन लॉन्च होत असतात. यामध्ये Asus कंपनीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे.  Asus 6Z हा आकर्षक स्मार्टफोन आज भारतात लॉन्च झाला आहे.


या स्मार्टफोनची विक्री 26 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. या फोनमध्ये ड्युअल फ्लिप कॅमेरा आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. यात कॅमेरासाठी सोनीचा मानक IMX586 सेन्सर देखील वापरला जात आहे.

हा फोन तीन प्रकारांमध्ये  लॉन्च केला गेला आहे. पहिला प्रकारात 6 GB जीबी रॅम / 64 जीबी स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 31.999 रुपये आहे. तसेच दुसऱ्या प्रकारात 6 GB जीबी रॅम /128GB जीबी स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 34.999 रुपये तर तिसऱ्या प्रकारात 8GB रॅम / 256GB स्टोअरेजची किंमत 39.999 रुपये किंमत असणार आहे..

Asus Z6 ची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये तीन सिम कार्डचा पर्याय असेल. फोनमध्ये 5000 मिलिअॅम्पियर क्षमतेची बॅटरी आहे. या फोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी स्क्रीन आणि 8 जीबी रॅम आहे. तसेच ZenFone USB 6C टाइप सी  NFC, वाय-फाय 802.11 एसी (Wi-Fi 5), ब्ल्यूटूथ 5.0 व्हर्जन आणि जीपीएस देण्यात आले आहे.

2019 च्या इतर कंपन्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनप्रमाणेच या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोअरेजची निवड आहे.    हा फोन स्पेनमध्ये गेल्या महिन्यात लॉन्च झाला होता त्यावेळी त्याची किंमत 499 युरो (सुमारे 39,000 रुपये) होती.