मुंबई: देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेली महानगरी मुंबई. याच मुंबईचं वैभव दाखवणारा एक फोटो थॉमस पेस्के या फ्रेन्च अंतराळवीरानं टिपला आहे. थॉमस हा युरोपियन स्पेस एजन्सीचा अंतराळवीर असून, सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्य करतो आहे.


अंतराळस्थानक भारतावरून जात असताना त्यानं हा फोटो टिपला आणि शनिवारी पहाटे ट्विटरवर शेअर केला. प्रकाशानं उजळून निघालेलं मुंबई शहर, विमानतळाच्या एक्स आकारातल्या धावपट्ट्या, अंधारलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग हे सारं या फोटोत स्पष्ट दिसतं आहे.


अंतराळातून थॉमसनं आजवर अनेक देशातील शहरांचे फोटो टिपले आहेत. त्यानं आतापर्यंत मुंबईसह अनेक देशातील शहरांचे फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या:

इस्रोने 104 उपग्रह कसे सोडले?, यानाचा सेल्फी व्हिडिओ