जुनं फीचर हे नव्या नावानं रिलाँच केलं जाऊ शकतं. काही वृत्तानुसार, कंपनी आपलं जुनं फीचर Tagline नावानं पुन्हा आणू शकतं.
व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल WABetaInfo ही माहिती शेअर केली आहे.
नव्या फीचरमध्ये यूजर्स व्हिडिओ, फोटो आणि जीआयएफ अपलोड करु शकतात. जे पुढील 24 तासापर्यंत तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्यांना दिसू शकतं. यासोबतचं तुम्ही तिथं टेक्स्ट स्वरुपात स्टेटसही ठेऊ शकतात. पण यामुळे जुनं टेक्स्ट स्टेटस गेलं आहे. त्यामुळे 24 तासानंतर तुम्हाला फोटो आणि स्टेटस बदलणं गरजेचं आहे.
फेसबुकचंच सोशल मीडिया अॅप इंस्टाग्राममध्ये यापूर्वी स्टोरी फीचर आलं आहे. ज्यामध्ये तुम्ही फोटो, व्हिडिओ अपलोड करु शकतात. पण सध्या व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचरबाबत अनेकांनी नापसंती जाहीर केली आहे. त्यामुळे भविष्यात व्हॉट्सअॅप या फीचरबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
WhatsAppचं यूजर्संना खास गिफ्ट!