रिलायन्सच्या फ्री कॉलिंगवर ट्रायची भूमिका काय? : अरविंद सावंत
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2016 12:04 PM (IST)
मुंबई : 'रिलायन्सच्या मोफत सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारनं याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी' अशी मागणी शिवसेना खासदार आणि महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी केली आहे. मार्केटिंगसाठी रिलायन्स पंतप्रधानांचा फोटो वापरत असेल तर 'कोण कुणाच्या मुठ्ठीत आहे' हे यावरुन समजतं, असा टोलाही सावंत यांनी हाणला आहे. रिलायन्सच्या योजनेकडे जर ट्राय क्रांतीच्या स्वरुपात बघत असेल तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल आणि एमटीएनएल देखील त्यांच्या ग्राहकांना अशी सुविधा मोफत उपलब्ध करुन देणार का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. https://twitter.com/AGSawant/status/771598116495560704 https://twitter.com/AGSawant/status/771599184436662272