चेन्नई : अॅपलने चेन्नईजवळ फॉक्सकॉन प्लांन्टमध्ये आपल्या फ्लॅगशिप फोन Iphone 11 चं उत्पादन सुरु केलं आहे. यामुळे चीनला मोठा दणका झटका बसला आहे. अॅपलने पहिल्यांना भारतात टॉप ऑफ द लाईन मॉडल तयार केलं आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाचं हे मोठं यश मानलं जात आहे. केंद्रीय मंत्री  पियुष गोयल यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. टप्प्याटप्प्याने या फोनचं उत्पादन वाढवलं जाणार आहे.


आयफोन 11 च्या किमतीत घट होण्याची शक्यता


अॅपलने सध्या आयफोन 11 ची किंमत कमी केलेली नाही. कारण सध्या विकले जाणारे फोन चीनमध्ये तयार केलेले आहेत. मात्र इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हच्या माहितीनुसार, लोकल (भारतात) प्रोडक्शनमुळे अॅपलचा 22 टक्के आयात कर वाचणार आहे. त्यामुळे आयफोनच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. अॅपल सध्या बेंगळुरु येथील विस्ट्रॉन प्लांटमध्ये नवी Iphone SE तयार करण्याचा विचार करत आहे.


अॅपलचं हे पाऊल म्हणजे देश पातळीवर उत्पादन करण्याच्या विचार कंपनी करत आहे. कंपनी सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह स्कीमचा फायदा घेण्याचा विचार करत आहे. अॅपलला यामुळे चीन बाहेर प्रोडक्शन बेस वाढवण्यास मदत मिळणार आहे. चीन आणि अमेरिकेच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे फायदेशीर ठरणार आहे.


संबंधित बातम्या :