काय आहेत फीचर्स?
फोटोः IOS 10 च्या अपडेटमध्ये फोटो अॅप अजूनच खास झालं आहे. फोटोच्या अॅपमध्ये आता ऑब्जेक्ट, सीन रिकॉग्निशन आणि फेशिअलच्या फीचर्ससह विविध पर्याय उपलब्ध आहेत.
अॅपलची ओळख बदलणारी ios 10 अपडेट
व्हॉईस कमांडः IOS 10 कडून देण्यात आलेल्या सिरी या व्हर्चुअल असिस्टंट अॅपच्या माध्यमातून अॅपल युजर्स iPhone, MacBook वर फाईल सर्च करण्याव्यतिरिक्त इतरही कामं करु शकणार आहेत. व्हॉईस कमांडमुळे अॅपल ऑपरेटिंग अधिकच सोपं झालं आहे.
इमोजीः IOS 10 मध्ये अॅपल फोनचे इमोजी बदलण्यात आले आहेत. शिवाय स्क्रिनवर व्हर्चुअल फुग्यांचं अॅनिमेशन असणार आहे.
अॅपल न्यूजः IOS 10 च्या अपडेटमध्ये अॅपल न्यूज आता स्क्रिन लॉक असतानाही वाचता येणार आहे.
आयमेसेज कॅमेरा इंटिग्रेशन, बबल इफेक्ट, लिंक प्रीव्ह्यू यांसारखे फीचर्स IOS 10 मध्ये अॅड करण्यात येणार आहेत.
असा करा फोन अपडेट
आयफोन अपडेट करण्याआधी बॅटरी पूर्ण चार्ज करावी आणि वायफायवरच फोन अपडेट करावा. त्या अगोदर महत्वाच्या सर्व फाईल्सचं बॅकअप घ्यावं. अपडेट करताना सर्व डाटा डिलीट होण्याची शक्यता असते. ही अपडेट आयफोन 5 नंतरच्या सर्व फोनवर मिळणार आहे.
असं घ्या बॅकअप
सेटिंग>iCloud>बॅकअप>बॅकअप नाऊ
अशी मिळवा ios 10 अपडेट
सेटिंग>जनरल>सॉफ्टवेअर अपडेट> (अपडेट उपलब्ध असेल तर डाऊनलोड आणि इंस्टॉल हे पर्याय दिसतील)