मुंबई : आयफोन 7 आणि अॅपलचं स्मार्टवॉच 2 याशिवाय आणखी एक गोष्ट सध्या अॅपल यूझर्सना खुणावत आहे. तुमचा-आमचा लहानपणीचा सोबती असलेला सुपर मारियो. हा गेम आयओएस 10 मध्ये एका नवीन अवतारात भेटीला येणार आहे.
सुपर मारियो रन या नावाने लाँच झालेला हा गेम सध्या फक्त आयफोन यूझर्सनाच उपलब्ध आहे. आयफोन 7 च्या लाँचवेळीच याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अँड्रॉईड यूझर्सनाही हा गेम लवकरच उपलब्ध होईल, असं निनटेंडो कंपनीने जाहीर केलं आहे. मात्र प्ले स्टोअरमध्ये तो कधी येणार, याची माहिती नाही.
आयफोन 8 पुढच्या वर्षी
आयफोन 7 लाँच होतो, तोच आयफोन 8 बाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयफोन 8 पुढच्या वर्षी युझर्सच्या भेटीला येणार आहे. 2017 च्या अखेरीस आयफोनची पुढची आवृत्ती येईल.