Apple Watch Series 7 vs Apple Watch Series 8 : अलिकडच्या काळात लोकांमध्ये अ‍ॅपल (Apple) वॉच (Apple Watch) आणि आयफोन (IPhone) यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतीच अ‍ॅपलकडून वॉच सीरीज 8 लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे लोक आता नव्या अ‍ॅपलकडून वॉच सीरीज 8 ची तुलना बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या अ‍ॅपलकडून वॉच सीरीज 7 सोबत करत आहेत. या दोन्हीमध्ये कोण वरचढ आहे. याबाबत जाणण्यासाठई लोक अधिक उत्सुक आहेत. आम्ही तुम्हाला अ‍ॅपलकडून वॉच सीरीज 8 आणि अ‍ॅपलकडून वॉच सीरीज 7 यांच्यातील फरकाबाबत सांगणार आहोत.


अ‍ॅपल वॉच सीरीज 8 (Apple Watch Series 8)


किंमत : अ‍ॅपलकडून नुकतीच वॉच सीरीज 8 लाँच करण्यात आली आहे. अ‍ॅपल वॉच सीरीज 8 जीपीएस व्हेरियंटची (Apple Watch Series 8 GPS) किंमत 399 डॉलर म्हणजेच 31 हजार 800 इतकी आहे. तर अ‍ॅपल वॉच सीरीज 8 एलटीई व्हेरियंटची (Apple Watch Series 8 LTE) किंमत 39 हजार 800 रुपये आहे. अ‍ॅपल वॉच सीरीज 8 चं अल्युमिनिअम मॉडेल चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर स्टेनलेस स्टील मॉडेल तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचं प्री-बुकींग सुरु झालं आहे. अ‍ॅपल वॉच सीरीज 8 ची विक्री 16 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.


फिचर्स


या घड्याळात क्रॅश डिटेक्शन (Crash Detection) हे नवीन फिचर आहे. हे फिचर दोन मोशन सेन्सरवर काम करते. ज्यामुळे असामान्य हालचाली अर्थात धोका आढळल्यास या फिचरद्वारे SOS युजरच्या कुटुंबियांना किंवा मित्रमंडळींना फोन करुन धोक्याचा इशारा देईल. या वॉचच्या बॅटरीची कार्य क्षमता 18 तास आहे. तसेच, लो पॉवर मोडमध्ये चालवल्यास वॉचची क्षमता दुप्पट होते म्हणजेच 36 तास होते. जुन्या अ‍ॅपल वॉचमधील ECG, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग (SpO2) आणि फॉल डिटेक्शन यासारखी जुनी फिचर्स  कायम आहेत.


महिलांसाठी खास बदल


अ‍ॅपल वॉच सीरीज 8 मध्ये महिलांसाठई खास बदल करण्यात आले आहेत. महिलांसाठी यामध्ये खास फिचर देण्यात आलं आहे. यामुळे महिलांना मासिक पाळीची तारीख, त्यानुसार होणाऱ्या शारीरिक बदलांची माहिती आणि त्याची नोंद ठेवता येईल.


किंमत 


अ‍ॅपलकडून नुकतीच वॉच सीरीज 8 लाँच करण्यात आली आहे. अ‍ॅपल वॉच सीरीज 8 जीपीएस व्हेरियंटची (Apple Watch Series 8 GPS) किंमत 399 डॉलर म्हणजेच 31 हजार 800 इतकी आहे. तर अ‍ॅपल वॉच सीरीज 8 एलटीई व्हेरियंटची (Apple Watch Series 8 LTE) किंमत 39 हजार 800 रुपये आहे. अ‍ॅपल वॉच सीरीज 8 चं अल्युमिनिअम मॉडेल चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर स्टेनलेस स्टील मॉडेल तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचं प्री-बुकींग सुरु झालं आहे. अ‍ॅपल वॉच सीरीज 8 ची विक्री 16 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.


अ‍ॅपल वॉच सीरीज 7 (Apple Watch Series 7)


फिचर्स 


अ‍ॅपल वॉच सीरीज 7 जलद चार्जिंगसह 8 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये सुमारे 8 तास तुमची झोप ट्रॅक करू शकते. या घड्याळात दिलेल्या मोठ्या बटणाने हे चालवणं सोयीस्कर होतं. हे वॉच IP6X रेझिस्टन्ससह स्विमप्रूफ देखील आहे. Apple Watch Series 7 S7 चिपसेटवर काम करते. या वॉचचं अॅल्युमिनियम मॉडेल पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. OS 8 वर चालणारे हे वॉच 45 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. याचे फिचर्स अ‍ॅपल वॉच सीरीज 6 प्रमाणे आहेत.


किंमत 


अ‍ॅपल वॉच सीरीज 7 हे 2021 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. तेव्हा त्याची किंमत 399 डॉलर म्हणजे 29,379 रुपये होती. त्यावेळी अ‍ॅपल सीरीज 3 ची किंमत 199 डॉलर म्हणजेच 14653 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. आणि Apple Watch SE ची किंमत 279 डॉलर म्हणजेच 20543 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती.