मुंबई : आयफोननंतर आता अॅपलनं आपल्या आयपॅड सेगमेंटकडेही लक्ष देणं सुरु केलं आहे. यासाठी अॅपल लवकरच बजेट रेंजमधील आयपॉड लाँच करणार आहे. हा आयपॅड 9.7 इंच स्क्रिनचा असणार आहे. त्यामुळे आता अॅपल बजेट डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

DigiTimesच्या वृत्तानुसार, अॅपला आपला नवा आयपॅड 2018 साली लाँच करु शकतं. ज्याची किंमत 259 डॉलर (16,500 रुपये ) असेल. तर अॅपलचा एअरपॅड 150 डॉलरमध्ये उपलब्ध आहे.

अॅपलला मागच्या वर्षी टॅबलेट सेगमेंटमध्ये नुकसान सहन करावं लागलं होतं. पण  आता लाँच केलेला टॅबलेटमुळे  नफा वाढण्याची मोठी शक्यता  कंपनीला वाटते.

या आयपॅडसाठी अॅपलनं तैवानी कंपनी कोपल इलेक्ट्रॉनिकशी करारही केला आहे.