नवी दिल्लीः महिंद्राने कॉम्पॅक्ट एसयूव्ही बोलेरे पावर प्लस हे नवं मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीची किंमत केवळ 6 लाख 59 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये गाडीची लांबी कमालीची कमी केली असून केवळ 4 मीटर एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र उंची आणि रुंदी बोलेरो एवढीच आहे.


 

टॅक्स वाचण्यासाठी या गाडीमध्ये डीझेल इंजिन बसवण्यात आलं आहे. त्यामुळे बोलेरोपेक्षा मिनी बोलेरोची किंमत जवळपास एक लाख रुपयांनी कमी आहे. मिनी बोलेरोच्या इंजिनचा आकार बोलेरोच्या इंजिनपेक्षा छोटा आहे. मात्र हे इंजिन बोलेरोच्या मॉडेलपेक्षा 13 टक्क्यांनी दमदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

 

महिंद्राची बोलेरो ही गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त विकली गेलेली एसयूव्ही आहे. त्यामुळे यापुढेही दमदार गाड्या महिंद्रा आणणार आहे, अशी माहिती महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शाह यांनी दिली.