मुंबई : देशभरात गणपती विसर्जनाचा उत्साह असताना, तिकडे मोबाईल जगतात अॅपलने धुमाकूळ घातला आहे. अॅपलने iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत एक -दोन नव्हे तर तब्बल 22 हजार रुपयांची कपात केली आहे.



iPhone 6s (128GB) हा 82 हजार रुपयांचा फोन आता 60 हजार रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. तर iPhone 6s Plus (128GB) हा 92 हजार रुपयांचा फोन आता 70 हजार रुपयांत मिळणार आहे.



अॅपलने नुकतेच त्यांचे बहुचर्चित iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे फोन लाँच केले आहेत. भारतात हे फोन 7 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत भरघोस कपात केली आहे.



अॅपलचा 4 इंच iPhone SE हा या वर्षीच्या सुरुवातीलाच लाँच झाला होता. या फोनच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. हा फोन 48 हजार रुपयांचा होता, तो आता 44 हजार रुपयांत देण्यात येत आहे.



iPhone 7 आणि iPhone 7 Plus या फोनचे ऑफिशियल बुकिंग कंपनीने सुरु केले नसले, तरी आयवर्ल्ड सारख्या कंपन्यांनी या फोनसाठी बुकिंग सुरु केलं आहे.



अॅपलने iPhone 6s आणि iPhone 6s Plus हे फोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केले होते. त्यावेळी iPhone 6s (16GB) ची किंमत 62 हजार रुपये होती. तर iPhone 6s Plus (16GB) ची किंमत 72 हजार रुपये होती.


*आयफोन 6S फिचर्स*


आयफोन 6s मध्ये 4.7 इंच स्क्रिन आहे. यामध्ये सर्वाधिक फास्ट प्रोसेसर चिप A9 वापरण्यात आली आहे. तर 2 जीबी रॅम आहे. तसंच 6sमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.


आयफोन 6S आणि 6S प्लसची वैशिष्ट्यं :

दोन्ही हँडसेटमध्ये 3 डी टच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे आयफोनचा डिस्प्ले तीन प्रकारचे टच जाणू शकतो. टॅप म्हणजे हलकासा स्पर्श, प्रेस म्हणजे जोर लावून स्पर्श आणि डीपर प्रेस थोड्या वेळासाठी स्क्रीन धरुन केलेला स्पर्श.



अॅपलचे हे दोन्ही फोन 16 GB, 32 GB आणि 64 GB अशा तिन्ही वेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. फोन वाकू नये म्हणून 7000 सीरीज अॅल्युमिनियमचा वापर केला आहे.



अॅपचा अॅक्सेस न करता वापरता येणारे "Get Directions" किंवा  "Take Selfie" असे फीचर्सही आयफोनमध्ये आहेत.



आयफोन 6 S फीचर्स :

कॅमेरा : 12 मेगापिक्सल

सेल्फी कॅम : 5 मेगापिक्सल

डिस्प्ले : 4.7 इंच

कलर : सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड

ऑपरेटिंग सिस्टम : iOS 9



आयफोन 6 s प्लस फीचर्स :

कॅमेरा : 12 मेगापिक्सल

सेल्फी कॅम : 5 मेगापिक्सल

डिस्प्ले : 5.5 इंच

कलर : सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड

ऑपरेटिंग सिस्टम : iOS 9

संबंधित बातमी

45 हजाराचा आयफोन 5S अवघ्या 22 हजारात

संबंधित बातमी : 45 हजाराचा आयफोन 5S अवघ्या 22 हजारात