लॉस एंजिलिस : स्मार्टफोनवर सेल्फी काढून इतरांसोबत शेअर करणे आपल्याला आनंदी बनवू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने सेल्फी काढून इतरांसोबत शेअर करणे आपल्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतं असं या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.



या संशोधनात 20 मुली आणि 12 मुलांनी सहभाग घेतला होता. या मुलांच्या दिवसभरातील वर्गातील, कॉलेजमधील आणि मित्रांसोबत फिरतानाच्या नोंदी ठेवण्यात आल्या. 41 मुलांवर 4 आठवडे हा अभ्यास करण्यात आला.



"स्मार्टफोनवरुन सेल्फी घेणे आणि शेअर करण्याने सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते, असं आमच्या संशोधनातून समोर येतं," असं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे पोस्ट डॉक्टरेट आणि लेखक यू चेन यांनी स्पष्ट केलं आहे.



या संशोधनादरम्यान सेल्फी घेण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या अॅपचा वापर करण्यात आला होता. या अॅपच्या माध्यमातून मानसिक स्थितीबद्दलही माहिती संकलीत करता येते. या संशोधनामुळे सेल्फी काढून शेअर करणे आपल्याला आनंदी ठेवते अशी माहिती समोर आली आहे.