Apple WWDC 2022 : Apple ने वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) इव्हेंटमझ्ये अनेक मोठे बदल करून आपल्या iPhone ग्राहकांसाठी iOS 16 सादर केला. यासोबतच या इव्हेंटमध्ये Apple ने आपला नवीन MacBook देखील लॉन्च केला आहे. ज्यामध्ये कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक फिचर्सची मेजवाणी देण्यात आली आहे. नव्या MacBook मध्ये कंपनीकडून M2 प्रोसेसर देण्यात आला आहे. 


Apple नं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 5nm डिझाइन केलेला M2 प्रोसेसर 25 अब्ज ट्रान्झिस्टरसह Apple च्या सिलिकॉनची नेक्सट जेनरेशन आहे. असं सांगितलं जात आहे की, M2 प्रोसेसर 10-कोर GPU आहे आणि तो 8-कोर CPU वर काम करतो. हा प्रोसेसर 24GB ची युनिफाइड (Unified) मेमरी हाताळू शकतो.


M2 चिपसेट M1 पेक्षा अधिक शक्तिशाली 


ऍपलच्या मते, पीसी चिप्स आणि जुना M1 च्या तुलनेत नवा M2 अधिक शक्तिशाली आहे. कार्यक्रमादरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा M2 चिपसेट एक Dedicated Neural Engine आहे, जो 8K व्हिडीओला सपोर्ट करू शकतो. सध्या अॅपलचा मॅकबुक एअर (MacBook Air) स्टारलाईट, मिडनाईट, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये दोन थंडरबोल्ट पोर्ट दिले जात आहेत. तसेच, अॅपल मॅक बुक एअर MagSafe सह चार्ज केलं जाऊ शकते.



लिक्विड रेटिना डिस्प्ले मॅकबुक एअरमध्ये उपलब्ध असेल


Apple ने या MacBook Air मध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला आहे. त्यासोबत तीन माइक देखील दिले आहेत. मॅकबुक एअरची स्क्रीन साईज 13.6 इंच देण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिडीओ कॉलसाठी 1080p फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या मते, या मॅकबुक एअरचा बॅटरी बॅकअप 18 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकसह येत आहे. जे 67-watt अॅडॉप्टरनं चार्ज केलं जाऊ शकतं.


सध्या अॅपलनं या M2 प्रोसेसरसोबत MacBook Pro देखील लॉन्च केला आहे. ज्याचा बॅटरी बॅकअप अधिक चांगला करण्यात आला आहे. Apple च्या M2 प्रोसेसरसह Apple MacBook Air ची किंमत US $ 1099 पासून सुरू होत आहे, तर M2 चिपसेटसह येणार्‍या MacBook Pro ची सुरुवातीची किंमत US $ 1299 ठेवण्यात आली आहे.


Apple MacBook ची भारतात किंमत काय? 
 
Apple च्या माहितीनुसार, नवीन MacBook Air आणि 13-inch MacBook Pro पुढील महिन्यात निवडक Apple अधिकृत किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. मात्र, कंपनीकडून कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. M2 चिपसेटसह Apple च्या MacBook Air ची किंमत 1,19,900 रुपये आणि शिक्षणासाठी 1,09,900 रुपये आहे. M2 सह 13-इंचाचा MacBook Pro 1,29,900 रुपये आणि शिक्षणासाठी 1,19,900 रुपयांपासून सुरू होतो. 35W ड्युअल USB-C पोर्ट पॉवर अॅडॉप्टर 5,800 रुपयांना उपलब्ध असेल.