काही काळापासून ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने कंपनी तमिळनाडूच्या प्लांटमध्ये 10 हजार महिलांना नोकऱ्या देणार आहे. एवढेच नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सर्व जबाबदारी फक्त महिलांची असेल. कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या मते, महिला या प्लांटचे संचालन करतील.
10 हजार महिलांना नोकऱ्या मिळतीलओलाचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, स्वावलंबी भारताला आत्मनिर्भर स्त्रीची गरज आहे. पूर्णपणे महिला चालवत असलेला हा जगातील एकमेव मोटार वाहन निर्मिती प्रकल्प असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये सुमारे 10 हजार महिलांना नोकऱ्या मिळणार आहे. ते म्हणाले की, महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक समावेशक कार्यबल तयार करण्याच्या दिशेने हे आमचे पहिले पाऊल आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की कंपनीने या महिलांचे मुख्य उत्पादन कौशल्य सुधारण्यासाठी भरपूर गुंतवणूक केली आहे. प्लांटमध्ये बनवलेल्या प्रत्येक वाहनासाठी महिला जबाबदार असतील.
'कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक'भाविश अग्रवाल म्हणाले की, केवळ महिलांनाच कार्यक्षेत्रात समान संधी मिळाल्याने देशाच्या GDP मध्ये 27 टक्के वाढ होऊ शकते. ते म्हणाले की, उत्पादनात महिलांचा वाटा सर्वात कमी 12 टक्के आहे. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सक्षम करणे केवळ त्यांचे जीवन बदलणार नाही तर त्यांचे कुटुंब आणि समाज सुधारेल. भारताला जगातील उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आपण महिलांना कामात समाविष्ट केले पाहिजे आणि त्यांचे कौशल्य वाढवले पाहिजे यावरही त्यांनी भर दिला.
10 लाखांच्या क्षमतेने उत्पादन होणार2020 मध्ये ओलाने तामिळनाडूतील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर प्लांटवर 2,400 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले की सुरुवातीला 10 लाख प्रतिवर्षाच्या क्षमतेने उत्पादन सुरू केले जाईल. त्याचबरोबर बाजाराच्या मागणीनुसार त्यात वाढ केली जाईल.