सेल्फीचा मोह जीवावर, शाळकरी मुलाचा बळी
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2016 06:02 AM (IST)
हैदराबाद : सेल्फीचा मोह पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. यावेळी सेल्फीच्या मोहाने हैदराबादच्या शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सेल्फीच्या मोहाने मृत्यू झाला आहे. हैदराबादेतील प्राणीसंग्रहालयात एका टेकडीवरून सेल्फी घेताना, तोल जाऊन पडल्यामुळे मंजीत चौधरी या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मंजीतने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर तो पिकनिकसाठी बहिण आणि भाऊजींसोबत हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयात गेला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली.