मुंबई : अमेझॉनने भारतातील 2018 च्या ‘प्राईम सेल डे’ची घोषणा केली आहे. भारतात 16 जुलैला हा सेल सुरु होणार असून अमेझॉनच्या प्राईम युझर्सला मात्र या नियोजित तारखेअगोदरच सेलचा फायदा घेता येणार आहे.
अमेझॉनची प्राईम सेल ही खास ऑफर 16 जुलैला दुपारी 12 पासून 18 जुलैला दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक नवे प्रोडक्ट्स लॉन्च होतील जे खास ऑफर्ससह ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.
‘हे’ प्रोडक्ट्स होणार लॉन्च
वेगवेगळ्या कॅटेगरीतील तब्बल 200 प्रोडक्ट्स या प्राईम डे सेलमध्ये लॉन्च होणार आहेत. त्यामध्ये वनप्लस, नेस्ले, नेसप्लस, एचपी, एसर यांसारख्या ब्रँडच्या प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे. अमेझॉनच्या मागील वर्षीच्या प्राईम डे सेलमध्ये तब्बल 10 लाख प्रोडक्ट्सची विक्री झाली होती.
आकर्षक ऑफर्स
मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. त्यासोबतच एक्स्चेंज ऑफरद्वारेही ग्राहकांना तीन हजारांपर्यंत अधिकची सूट मिळू शकणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, वॉशिंग मशिन यांसह इतर गृहपयोगी साधनांवर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
Amazon prime day sale : 16 जुलैपासून बंपर सेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2018 11:07 PM (IST)
अमेझॉनची प्राईम सेल ही खास ऑफर 16 जुलैला दुपारी 12 पासून 18 जुलैला दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक नवे प्रोडक्ट्स लॉन्च होतील जे खास ऑफर्ससह ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -