Amazon Deal On iPhone 12 Pro Max :  सध्या अॅन्ड्रोईडच्या मोबाईलची क्रेझ तरूणाईत मोठ्या प्रमाणात आहे. इतरांप्रमाणे आपल्याकडेही आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. स्टाईल स्टेटमेंट म्हणूनसुद्धा आयफोन वापरणारा तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या अॅमेझॉनवर iPhone चं सर्वात महागडं मॉडेल iPhone 12 Pro Max वर चांगली सूट मिळतेय. आयफोनचे फीचर्स तर कमाल आहेतच पण त्याचबरोबर या मोबाईलची स्क्रिनसुद्धा 6.7 इतकी आहे. प्रोफेशनल कॅमेरा आणि व्हिडीओ शूटच्या बाबतीत तर आयफोनची टक्कर कोणीच करू शकत नाही. या मोबाईलचं वैशिष्ट्य म्हणजेच, हा फोन वायरलेस चार्जिंगलासुद्धा सपोर्ट करतो. 


iPhone 12 Pro Max (256GB)ची मूळ किंमत 1,39,900 रूपये आहे, पण ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला 1,29,900 रूपयांना मिळतोय. म्हणजेच, जवळपास 10 हजारांच्या सवलतीत मिळतोय. या मोबाईलचा कलर गोल्ड आहे. या व्यतिरिक्त हा फोन ग्रे आणि व्हाईट कलरमध्येदेखील उपलब्ध आहे. या मोबाईलचा दुसरा मॉडेल 512GB चा आहे, ज्याची किंमत ऑफरमध्ये केवळ 1,49,900 रूपये आहे. 


काय आहेत iPhone 12 Pro Max च्या दुसऱ्या ऑफर्स :
या मोबाईलवर तुम्हाला 14,900 रूपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही मिळू शकतो. ज्यामध्ये तुम्ही जुना मोबाईल देऊन 14,900 रूपयांचा डिस्काऊंट घेऊ शकता. या मोबाईलवर नो कॉस्ट EMIचासुद्धा ऑप्शन आहे. ज्यामधून तुम्ही व्याज न देता प्रत्येक महिन्याच्या इंन्टॉलमेंटमध्ये तुम्ही पैसे भरू शकता. 


iPhone 12 Pro Max (256GB)चं वैशिष्ट्य :



  • Max (256GB)चं वैशिष्ट्य- आयफोन 12 प्रो मॅक्सचं वैशिष्ट्य म्हणजे याची स्क्रिन साईज. या मोबाईलची साईझ आयफोनच्या एकूण मॉडेलपेक्षा मोठी आहे. 6.7 इंचाच्या या स्क्रिनला सुपर रेटिना  XDR डिस्प्ले आहे. 

  • आयफोन आणखी ओळखला तो त्याच्या कॅमेरा फीचर्समुळे. या मोबाईलमध्ये प्रो कॅमेरा सिस्टम आहे. ज्यामध्ये 12MP अल्ट्रा वाइड आणि व्हाईड कॅमेऱ्याबरोबरच टेलिफोटो कॅमेरासुद्धा दिला आहे. या मोबाईलचा कॅमेरा नाईट मोड, डीप फ्यूजन, पोट्रेट मोड, Smart HDR 3, Apple ProRAW और 4K Dolby Vision HDR recording अशा वेगवेगळ्या फीचर्ससह उपलब्ध आहे. 

  • मोबाईलमध्ये नॅनो मीटर A14 ची चिप आहे जिच्याद्वारे बाकीच्या स्मार्टफोनपेक्षा हा मोबाईल जास्त स्पीड पकडतो. 

  • या आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंगबरोबरच फास्ट चार्जिंग फीचरसुद्धा आहे.  MagSafe एक्सेसरीजच्या सपोर्टमुळे हा फोन जास्त वेगाने चार्ज होतो. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]