नागपूर : डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करु, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते.
राज्यात एकूण 29 हजार ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करु, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, प्रायोगिक तत्वावर राज्यातील काही निवडक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून तिथे सरकारच्या सर्व सेवा डिजिटल स्वरूपात पुरवल्या जात आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
डिसेंबर 2018 पर्यंत संपूर्ण राज्यात डिजिटल सेवांचा विस्तार करू असे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामपंचायती डिजिटल झाल्यास त्याचा लाभ अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण भागातील सर्व शासकीय सोयींसाठी होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.