एअरटेलच्या डेटा किंमतीत कपात, नेट पॅक स्वस्त
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 10:17 AM (IST)
मुंबई: टेलीकॉम कंपनी आयडीयानंतर आता एअरटेलने आपल्या यूजर्ससाठी कमी किंमतीत 67% अधिक डेटा देण्याची घोषणा केली आहे. तसंच एअरटेलने आपल्या प्रीपेड मोबाइल डेटाच्या किंमतीत कपात केली आहे. या कपातीनंतर 655 रुपयात 4जी/3जी पॅकमध्ये 5जीबी डेटा मिळणार आहे. पूर्वी याच किंमतीत 3जी डेटा मिळत होता. त्यामुळे आता तब्बल 67% जास्त फायदा होणार आहे. एअरटेलच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये 455 रुपयात 4जी/3जी पॅकमध्ये 2जीबी मिळत होता. आता 3 जीबी डेटा मिळणार आहे. त्यामुळे आता तब्बल 54% फायदा होणार आहे. 25 रुपयात पूर्वी 2जी पॅकमध्ये 100Mb डेटा मिळत होता. मात्र, आता 145 Mb डेटा मिळणार आहे. नुकतंच एअरटेलनं आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी हॅप्पी अवर्सची घोषणा केली होती. भारती एअरटेलचे संचालक अजय पुरी यांनी सांगितलं की, 'हॅपी अवर्स हे एअरटेलचं एक इनोव्हेशन आहे. हे डेलव्हपर्स आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर आहे.' हॅप्पी अवर्स सर्व एअरटेल प्रीपेड ग्राहकांना उपलब्ध होईल. डेटा पॅक यूजर्स याचा फायदा उठवू शकतात.