नवी दिल्ली : गेम्सच्या जगतातील यंदाचा सर्वात लोकप्रिय गेम्समधील एक ‘ओव्हरवॉच’च्या एका कॅरेक्टरवरुन वादाला सुरुवात झाली आहे. गेम गेल्या दोन महिन्यांपासून खेळला जात आहे, मात्र अमेरिकेतील हिंदू नेते राजन जेड यांनी या गेमला आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
“गेममधील सिमेट्रा ही कॅरेक्टर हिंदू देवीसारखी वाटते.”, असा दावा राजन जेड यांनी केला आहे. राजन यांनी गेममधून सिमेट्रा कॅरेक्टर हटवण्याचीही मागणी केली आहे.
राजन जेड यांनी आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे की, “लोक देवीची पूजा करतात. जॉयस्टिक आणि कीबोर्डच्या माधअयमातून देवीला कंट्रोल करणं अपमानास्पद आहे.” राजन यांनी याआधीही अनेक गेम्समधील कॅरेक्टर्सवर आक्षेप घेतला होता.
राजन हे अमेरिकेतील नवादामध्ये राहात आणि हिंदू समाजाचे प्रतिनिधी मानले जातात. ते यूनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदूझमचे अध्यक्ष आहेत.
याआधीही ‘ओव्हरवॉच’ गेममधील कॅरेक्टर सेक्सी असल्याने वादात सापडला होता. त्यामुळे गेम हटवण्यात आला होता.