मुंबई : रिलायन्स जिओच्या स्वस्त डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता सर्वच टेलिकॉम कंपन्या सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे एअरटेलनंही आता एक नवा स्वस्त प्लॅन आणला आहे. एअरटेलने 129 रुपयांचा नवा प्लॅन लाँच केला आहे.या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये यूजर्सला फ्री हॅलो ट्यून्स मिळणार आहेत.


TelecomTalkच्या रिपोर्टनुसार, 129 रुपयात 1 जीबी डेटा, 100 मेसेज दररोज आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यातआला आहे. यासोबतच हॅलो ट्यून्सही देण्यात आल्या आहेत. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. हा प्लॅन काही नेमक्या सर्कलमध्येच उपलब्ध आहे. हा प्लॅन तुम्हाला उपलब्ध आहे की नाही हे तुम्ही माय एअरटेल अॅप किंवा एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

जिओने देखील 98 रुपयांचा एक प्लॅन लाँच केला होता. ज्यामध्ये यूजर्सला 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलं आहे. हा प्लॅन देखील 28 दिवसांसाठी वैध आहे. पण यामध्ये तुम्हाला हॅलो ट्यून्ससारखी ऑफर मिळणार नाही.