रिलायन्स जिओच्या अनलिमिटेड कॉल्स, फ्री इंटरनेट इत्यादी ऑफरनंतर एअरटेलने तयारी सुरु केली होती. कारण जिओसोबत अनेक कंपन्यांची कडवी स्पर्धा झाली होती. त्यामुळेच जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा डेटा प्लॅन लॉन्च केला.
एअरटेलची ऑफर काय आहे?
एअरटेलने प्रोमो ऑफरनुसार 2जी आणि 3जी यूझर्सना 2 जीबीपर्यंत 4G डेटा उपलब्ध केला आहे. एअरटेलचे यूझर्स सध्या 2जी किंवा 3जी सिमचा वापर करत आहेत. ज्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास वेबसाईटवर जाऊन सिम 4G सिममध्ये अपग्रेड करावं लागेल.
सिमला 4G मध्ये अपग्रेड करण्यासाठी एअरटेलच्या वेबसाईटवर जाण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला ईमेल, आयडी, फोन नंबर, पत्ता इत्यादी भरावं लागेल. यानंतर 'सेंड मी 4G सिम'च्या पर्यायवर क्लिक करा. सिम अपग्रेड होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
सिम अपग्रेड झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरुन यूझर्सने 52122 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
2 जीबी 4G डेटासाठी 48 तास लागणार
52122 या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर यूझर्सना 48 तासांनंतर एक मेसेज मिळेल. ज्यामध्ये 2 जीबी 4G डेटा एअरटेल नंबरवर मिळण्याची माहिती असेल. ही ऑफर प्रीपेड यूझर्ससाठीच असून, 4G नेटवर्कमध्ये असाल, त्यावेळीच या ऑफरचा लाभ मिळणार आहे.