या अॅपवरुन एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर नागरिकांना मत व्यक्त करण्यास मोदींनी सांगितले आहे. एका सर्व्हेच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरं सहभागी व्यक्तींना द्यावी लागणार आहेत.
हे अॅप गूगल प्ले स्टोरवरुन इन्सॉल केल्यानंतर यामध्ये तुमच्या मतदार ओळखपत्राच्या आधारे सुरुवातीला नोंदणी करावे लागते. त्यानंतर नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भातील विविध प्रश्नांद्वारे तुमची मते नोंदवली जात आहेत.
दरम्यान, यापूर्वी देखील नोटाबंदीसंदर्भातील 2000 रुपयाच्या नव्या नोटा ओळखण्याचे 'किनोट' नावाचे अॅप बाजारात उपलब्ध झाले होते. या अॅपने 2000 रुपयांची नोट स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे दिनांक 8 नोव्हेंबर रोजीचे भाषण सुरु होत होते.