मुंबई : रिलायन्स जिओच्या स्वस्त डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम क्षेत्रातील सर्वच कंपन्या आपापल्या परीने नवनवे प्लॅन बाजारात आणत आहेत. टेलिकॉम क्षेत्रात एअरटेलकडे मोठी स्पर्धक कंपनी म्हणून पाहिले जाते. याच एअरटेल कंपनीने आता 129 रुपयांचा आकर्षक प्लॅन लॉन्च केला आहे.
एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्लॅनचं मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांना यामध्ये फ्री हॅलो ट्युन्स मिळतील. स्वस्त आणि मस्त अशा या प्लॅनची एअरटेलच्या ग्राहकांमध्ये उत्सुकता आहेच, त्याचबरोबर इतर ग्राहकांना काही प्रमाणात का होईना, पण आपल्याकडे खेचण्यात एअरटेल कंपनी यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे.
टेलिकॉम टॉकच्या वृत्तानुसार, 129 रुपयांच्या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना एक जीबी इंटरनेट डेटा, दररोज 100 मेसेज आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल अशा सुविधा मिळणार आहेत. मोफत हॅलो ट्युन्सही देण्यात येणार आहेत.
28 दिवसांच्या अवधीसाठी असलेला हा प्लॅन एअरटेलच्या काही ठराविक सर्कलसाठी लॉन्च करण्यात आला आहे. तुम्हाला या प्लॅनचा लाभ घेता येईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी एअरटेलच्या अॅपची मदत घेता येईल किंवा एअरटेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरुनही कळू शकेल.
एअरटेलने लॉन्च केलेल्या या प्लॅनसारखाच जिओचा 98 रुपयांमध्ये एक प्लॅन आधीपासूनच बाजारात आहे. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28 दिवसांच्या अवधीसाठी मिळतो. जिओच्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्युन्सची ऑफर नाही, जी एअरटेलच्या प्लॅनमध्ये आहे आणि हेच एअरटेलच्या प्लॅनचे वेगळेपण आहे.
129 रुपयांत आकर्षक ऑफर, एअरटेलचा नवा प्लॅन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2018 03:55 PM (IST)
एअरटेलने लॉन्च केलेल्या या प्लॅनसारखाच जिओचा 98 रुपयांमध्ये एक प्लॅन आधीपासूनच बाजारात आहे. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28 दिवसांच्या अवधीसाठी मिळतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -