महिन्याला 3 जीबी मोफत 4जी डेटा, एअरटेलची नवी ऑफऱ
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 09:33 PM (IST)
मुंबई : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलनं वर्षभर 3 जीबीचा फ्री डेटाची ऑफर दिली आहे. ही ऑफर 4 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत सुरु असेल. रिलायन्स जिओच्या मोफत डेटा ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं ही ऑफर आणल्याचं बोललं जात आहे. एअरटेलच्या या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना आपला नंबर एअरटेलमध्ये पोर्ट करावा लागणार आहे. एअरटेलच्या सध्याच्या ग्राहकांना 4जी अक्टिवेट करुनही या ऑफरचा लाभ घेता येऊ शकेल. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. तसंच या ऑफरचा कालावधी 31 डिसेंबर 2017 पर्यंत असेल. एअरटेलची ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना 345 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. या रिचार्जनंतर 30 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि 1 जीबीचा डेटाही देण्यात येईल. 3 जीबी डेटा मिळवण्यासाठी माय एअरटेल अप इन्स्टॉल करावं लागेल. एअरटेलच्या 345 च्या रिचार्जसाठी 9 हजारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या ऑफरसोबत जास्तीत जास्त ग्राहकांना 4जी सेवेचा लाभ देण्याचा मानस एअरटेलचे मार्केटिंग डायरेक्टर अजय पूरी यांनी व्यक्त केला आहे.