नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांची रिलायन्स जिओशी स्पर्धा सुरुच आहे. एअरटेलने आता 799 चा रिव्हाईज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये दिवसाला 3.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.


एअरटेलचा हा रिव्हाईज प्लॅन आहे. यापूर्वी याच प्लॅनमध्ये दिवसाला 3GB डेटा मिळत होता. मात्र आता ही मर्यादा 3.5GB करण्यात आली आहे. जिओचा 799 चा प्लॅन केवळ आयफोनसाठी होता. मात्र याच प्लॅनमध्ये एअरटेल आता प्रीपेड ग्राहकांना 28 दिवसांसाठी 98GB डेटा देणार आहे.

दरम्यान, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये फोनवर बोलण्यासाठी तुम्हाला मर्यादा आहे. दिवसाला 250 आणि आठवड्याला 1 हजार मिनिट वापरता येतील. लोकल आणि एसटीडी कॉलसाठी ही मर्यादा लागू असेल. एअरटेल पेमेंट बँक वॉलेटमधून रिचार्ज केल्यास ग्राहकांना 75 रुपये कॅशबॅकही देण्यात येत आहे.

जिओचा प्लॅन काय आहे?

  • जिओचा 799 रुपयांचा प्लॅन आहे

  • यामध्ये दिवसाला 3GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, मेसेज


एअरटेलचा प्लॅन काय आहे?

  • एअरटेलचा 799 रुपयांचा हा रिव्हाईज प्लॅन आहे

  • यामध्ये दिवसाला 3.5GB डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंग, मेसेज


(नोट : रिचार्ज करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवर जाऊन हा प्लॅन तुमच्यासाठी आहे का, याची खात्री करुन घ्या)