मेस्सीची निवृत्ती, मात्र ट्विटरवर आफ्रिदीवर जोक्सचा पाऊस
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 08:26 AM (IST)
मुंबई : फुटबॉल जगतातील आघाडीचा खेळाडू लायनल मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र मेसीच्या निवृत्तीनंतर ट्विटरवर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी ट्रेण्डिंगमध्ये आला आहे. आफ्रिदीच्या नावे अनेक जोक्स फिरत आहेत. मेसीने अल्पावधित निवृत्ती घेतली, पण अद्याप आफ्रिदीने घेतली नसल्याचं ट्विटराईट्सचं म्हणणं आहे. यापूर्वी शाहिद आफ्रिदीने अनेकवेळा निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र तरीही तो क्रिकेट खेळत राहिला. त्यामुळे आफ्रिदी केवळ घोषणा करतो, प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यावरुनच नेटिझन्सनी आफ्रिदीची फिरकी घेतली आहे. कोणी मेस्सीला आफ्रिदीप्रमाणे केवळ घोषणा करुन माघारी परतण्याचा सल्ला दिला आहे, तर कोणी मेस्सीने आफ्रिदीकडून काही शिकण्यास सांगितलं आहे. ट्विटरवरील काही जोक मनी लोगन म्हणतो - रिपोर्टर : तू निवृत्तीबाबत पुनर्विचार करणार आहेस? मेस्सी : नाही, मी आफ्रिदी नाही रमण म्हणतो - शाहिद आफ्रिदी पुन्हा निवृत्त झाला? तो का ट्रेण्ड होतोय? शेअर लॉक्ड या ट्विटरहॅण्डलवरुनही एक जोक ट्विट करण्यात आला आहे. त्यानुसार डियर मेस्सी, तो दरवर्षी निवृत्त होतो, प्रत्येक निवृत्तीनंतर परत येतो, त्यामुळे तू शाहिद आफ्रिदीसारखा हो.