मुंबई : दिल्लीत राहणाऱ्या 20 वर्षीय अदिती सिंह सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अदितीनं केलेल्या कारनाम्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अदितीनं आपल्या बुद्धिच्या आणि कौशल्याच्या जोरावर Microsoft Azure Cloud मध्ये कमतरता शोधून काढली आहे. अवघ्या 20 वर्षांची अदिती सिंह एक एथिकल हॅकर आहे. अदितीनं शोधलेल्या बगमुळे एखाद्या हॅकरला कंपनीच्या इंटरनल सिस्टिममध्ये पोहचून सगळी माहिती अगदी सहज मिळवणं शक्य होणार होतं. अदितीनं शोधलेल्या कमतरतेची दखल घेत कंपनीची मदत केल्यामुळे तिला 22 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलं आहे.
काही नवं शिकण्याचं ध्येय
अदितीनं सांगितलं की, "Microsoft Azure Cloud मध्ये बग शोधण्यामागील तिचं उद्दिष्ट पैसे कमावण्याचं नाही, तर काहीतरी नवं शिकण्याचं होतं. ती म्हणाली की, कोणत्याही हॅकरला असा बग शोधताना अत्यंत मन लावून काम करावं लागतं. अदितीने हे देखील सांगितलं की, मायक्रोसॉफ्टने यापूर्वी असाच एक बग दोन महिन्यांपूर्वी शोधला होता, त्यावर काम करुन कंपनीनं तो ठिकही केला होता. परंतु, रिमोट कोड एग्जीक्यूशन बगवर त्यांची नजर पडली नव्हती.
फेसबुकमध्ये शोधला होता बग
दरम्यान, यापूर्वीही अवघ्या 20 वर्षांच्या अदितीनं लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकमध्ये असाच एक बग शोधला होता. ज्यासाठी कंपनीने त्यांना 5.5 लाख रुपये दिले होते. अदितीनं दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टमध्ये एकाच प्रकारचे रिमोट कोड एग्जीक्युशन बग मिळाले आहेत. हे बग कंपनीसाठी अत्यंत नुकसानदायी ठरु शकत होते. अदितीनं बोलताना सांगितलं की, Microsoft Azure Cloud मध्ये सापडलेला बग शोधणं थोडं अवघड होतं, कारण हा बग ओळखणं काहीसं कठीण असून हा बग नव्या पद्धतीचा होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Drone कसे काम करते? देशात यासंदर्भात काय गाईडलाइन्स आहेत? नियम मोडल्यास शिक्षा काय? सर्व माहिती जाणून घ्या
- GB WhatsApp Update: जीबी व्हॉट्सअॅप काय आहे? त्याचा वापर कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या
- Recharge Plan : दर महिन्याला रिचार्जची कटकट नकोच; Jio, Airtel, Vodafone चे वार्षिक प्लान्स, कॉलिंग, एसएमएससोबतच अनेक सुविधा