नवी दिल्ली: 2016च्या सुरुवातीला Acer ने आपला Swift 7 हा नवा लॅपटॉप IFA कार्यक्रमावेळी लॉन्च केला होता. जगातील सर्वात कमी जाडीचा हा लॅपटॉप असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला होता. आता हा लॅपटॉप भारतीय बाजारपेठेतही लॉन्च करण्यात आला असून, 18 नोव्हेंबरपासून याची सर्वत्र विक्री सुरु होईल.


या लॅपटॉपची विक्री कंपनीच्या अधिकृत स्टोअर्सवरुनच होणार असल्याचे कंपनीने सांगितले असले, तरी फ्लिपकार्टवरुनही याची खरेदी करणे शक्य होणार आहे. या लॅपटॉपची किंमत 99,999 रुपये आहे.

लॅपटॉपची वैशिष्ट्ये

  • स्क्रीन 13.3 इंच, रिझॉल्यूशन कपॅसिटी1080x 1920

  • वजनाला हलका 1.1 किलो

  • जाडी 1 cm पेक्षाही कमी 9.98 मीमी

  • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन

  • बेस मॉडेल इंटलचे 7th जनरेशन आणि कोर i5 प्रोसेसर

  • 4 जीबी रॅम असून ती 8 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

  • 256 जीबी SSD स्टोअरेज

  • 9 तासांचा बॅटरीबॅक अप